आशियाई अजिंक्यपद नेमबाजी,सौरभ चौधरीने पटकावले रौप्यपदक

350

हिंदुस्थानच्या 17 वर्षीय सौरभ चौधरीने दोहा येथे खेळवण्यात येत असलेल्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजीत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 244.5 अंकांसह रौप्यपदक पटकावले. या प्रकारात कोरियाचा किम साँग गुक याने 246.5 अंकांसह सुवर्णपदक आपल्या नावावर केले. इराणच्या फोरोई जावेद याने 221.8 अंकांसह कास्यपदक मिळवले. हिंदुस्थानच्या अभिषेकला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांनी याआधीच या प्रकारात टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे, मात्र सोमवारी सौरभने मिळवलेले यश हे त्याच्या ऑलिम्पिकसाठीच्या वाटचालीसाठी प्रेरक ठरणार आहे. सोमवारी सौरभने प्राथमिक फेऱ्यांत अभिषेक सहाव्या तर सौरभ सातव्या क्रमांकावर होते

आपली प्रतिक्रिया द्या