‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ चळवळीचा 9 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

50
merit-protest-march

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात सध्या जनजागृतीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेले आहे. प्रशासकीय सेवा आणि शिक्षणासाठीच्या प्रवेश प्रक्रियेत आधीच जास्त असलेले आरक्षण वाढविण्यात येऊन खुल्या प्रवर्गातील जनतेवर आणि विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय शासनाने केला आहे. या अन्यायाच्या विरोधात 9 ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ऑगस्ट क्रांतीदिनी निघणार्‍या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही डॉ. राजेंद्र बेदमुथा व डॉ. दीपक लद्धड व त्याच्या सहकार्‍यांनी केले आहे. शासनाने जनतेचा हा आक्रोश ऐकूण निर्णय घेतला नाहीतर या शासनकर्त्यांविरुद्ध 40 टक्के मतदान जाईल असा इशारा दिला आहे.

आज बुलढाणा रेसीडेन्सी येथे मेरीट बचाओ राष्ट्र बचाओ कृती समितीद्वारे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेला या कृषी समितीचे डॉ. राजेंद्र बेदमुथा, डॉ. दीपक लद्धड, जी. टी. कुळकर्णी, डॉ. संगिता दर्डा, प्राचार्य शाहीना पठाण, विजय दर्डा, राजेश देशलहरा, डॉ. संजय बोथरा, भडेच, पठाणसर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. राजेंद्र बेदमुथा म्हणाले आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षण वाढविण्यात आले आहे व येत आहे, असा आक्षेप घेण्यात आला आहे. आरक्षण जरूर मिळावं पण त्यात मेरीट कमी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी याकरता हे आंदोलन असल्याचे सांगण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या