झटका! एचडीएफसी बँकेत किमान 25 हजार ठेवावे लागणार

hdfc-bank

एचडीएफसी बँकेने आपल्या खातेदारांना ऐन सणासुदीत जोरदार झटका दिला आहे. बँकेने बचत खात्यावर किमान शिल्लक रक्कम (मिनिमम बॅलन्स) ठेवण्याची मर्यादा वाढवली आहे. एचडीएफसी बँकेत आता 10 हजार रुपयांऐवजी 25 हजार रुपये ठेवावे लागणार आहेत. 25 हजार नसतील तर खातेदारांना दंड द्यावा लागेल. हा नियम 1 ऑगस्ट 2025 नंतर बचत खाते उघडणाऱ्या सर्व ग्राहकांना लागू असेल, असे बँकेने स्पष्ट केले आहे. सध्या एचडीएफसी बँकेच्या बचत खात्यात किमान 10 हजार रुपये असणे आवश्यक आहे. एकीकडे सरकारी बँका बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याचा नियम काढून टाकत असताना दुसरीकडे खासगी बँका बचत खात्यांवरील किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा वाढवत आहेत. 1 ऑगस्ट 2025 पासून नवीन बचत खातेधारकांसाठी हा नियम लागू असणार आहे.