
वडाळा विधानसभेतील सयानी रोड नाका येथील इराणी चाळीच्या दुसऱ्या मजल्यावर घरगुती रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन आग लागली. यावेळी शिवसेनेचे गटप्रमुख सचिन देसाई यांनी प्रसंगावधान दाखवत त्वरित आग विझवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्याचवेळी चाळीचे रहिवासी, शाखा समन्वयक चंदन साळुंखे यांनी त्वरित पोलीस प्रशासन व अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. सुदैवाने या स्पह्टात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मदतकार्यासाठी शाखा संघटक संजना पाटील, युवासेना विधानसभा चिटणीस जीत विरा, उपशाखाप्रमुख संजय मात्रे, उपशाखा समन्वयक सुनील पेडणेकर, गटप्रमुख सचिन हिरवे, अमोल बोरकर, रितेश पाटील, ओमकार बेर्डे, मयूर शिंदे उपस्थित होते.