31 मार्चपासून एसबीआयची लॉकर्स सेवा महागणार

515

31 मार्चपासून स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) लॉकर्स सेवा महागणार आहे. एसबीआयने सेफ डिपॉझिट लॉकर्सचे शुल्क 33 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने लॉकर्सच्या वार्षिक शुल्कात 500 रुपयांची वाढ केली आहे. एका वर्षासाठी लॉकर भाडय़ाने घेतल्यास दोन हजार रुपये भरावे लागणार आहेत.

मोठय़ा आणि अधिक मोठय़ा लॉकर्ससाठी नऊ हजार ऐवजी आता बारा हजार रुपये भरावे लागणार आहेत. तर मध्यम लॉकर एक हजारांनी महागले आहे. तसेच एका वर्षासाठी मोठय़ा लॉकरचे शुल्क दोन हजार रुपयांनी वाढून त्याचे वार्षिक शुल्क आठ हजार रुपये झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एका वर्षात ग्राहकाने एकदाही लॉकर उघडले नाही तर बँकेला ते लॉकर्स उघडण्याची परवानगी आहे, पण त्यापूर्वी बँक ग्राहकाला नोटीस पाठविते. हे नवे दर मेट्रो आणि अर्बन शहरांना लागू असून यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू नाही.

लॉकर नोंदणी फी

  • छोट्या आणि मध्यम आकाराच्या लॉकरसाठी 500 रुपये व जीएसटी
  • मोठ्या आणि अतिरिक्त आकाराच्या लॉकरसाठी 1000 रुपये व जीएसटी
  •  लॉकर शुल्क भरण्यास उशीर झाल्यास दंड म्हणून 40 टक्के रक्कम आकारणार
आपली प्रतिक्रिया द्या