एसबीआयचे गृहकर्ज झाले स्वस्त

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सणासुदीच्या दिवसांत तुम्ही घर घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) एक गूड न्यूज जाहीर केली आहे. बँकेने गृह कर्ज दरात 0.25 टक्के सूट देण्याची घोषणा आज केली.

या सवलतीमुळे ग्राहकांनी गृह कर्जासाठी अर्ज केल्यास, 75 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचे घर खरेदी केल्यास त्यांना 0.25 टक्के व्याजदरात सवलत देण्यात येणार आहे. एसबीआयतर्फे काही दिवसांपूर्वीच 30 लाख ते 2 कोटीपर्यंतच्या गृह कर्जासाठी ग्राहकांना 0.10 टक्के सवलत जाहीर केली होती. आता ही सवलत आणखीन वाढविण्याचा निर्णय घेत या कर्जासाठी बँकेने 0.20 टक्क्यांची सवलत दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

बँकेच्या योनो अॅपच्या माध्यमातून यासाठी अर्ज करता येणार असल्याचे बँकेने यावेळी नमूद केले आहे. याबद्दल बोलताना एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक सीएस सेट्टी म्हणाले की, या सणासुदीच्या काळात आमच्या संभाव्य गृह कर्ज ग्राहकांसाठी अतिरिक्त सलवत जाहीर करताना आनंद होत आहे.

गेल्या काही दिवसांत गृहकर्जाच्या मागणीत वाढ झाल्याने आम्ही ही सलवत जाहीर केली आहे. एसबीआयच्या सर्वात कमी व्याजामुळे घर खरेदीदारांना आता त्यांच्या स्वप्नातले घर खरेदी करण्यास प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.

आपली प्रतिक्रिया द्या