
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशभरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) ग्राहकांसाठी खूशखबर असून काही विशेष कालावधीच्या मुदत ठेवीवरील व्याज दर वाढवण्यात आला आहे. बँकेने मुदत ठेवीवरील व्याज दरात ०.०५ ते ०.१० टक्के वाढ केली आहे. हे नवीन दर सोमवारपासून (३० जुलै) लागू होणार आहेत. यापूर्वी एसबीआयने २८ मे रोजी व्याज दरांमध्ये बदल केला होता. एसबीआयने घेतलेल्या या निर्णयानंतर आता इतर बँकाही व्याज दरांबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.
एसबीआयने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, १ ते १० वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर खातेधारकांना ०.०५ ते ०.१० टक्के व्याज दर मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मुदत ठेवींवरील व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. बँकेने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी आज सोमवारपासून लागू होणार आहे.
एसबीआयच्या निर्णयानंतर बदलेला व्याज दर असा असेल –
१ वर्ष आणि २ वर्षापेक्षा कमी – ६.६५ वरून ६.७ करण्यात आले
२ वर्ष आणि ३ वर्षापेक्षा कमी – ६.६५ वरून ६.७५ करण्यात आले
३ वर्षआणि ५ वर्षापेक्षा कमी – ६.७ वरून ६.८ करण्यात आले
५ वर्ष आणि १० वर्षापेक्षा कमी – ६.७५ वरून ६.८५ करण्यात आले
ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींवरील व्याज दर –
१ वर्ष आणि २ वर्षापेक्षा कमी – ७.१५ वरून ७.२ करण्यात आले
२ वर्ष आणि ३ वर्षापेक्षा कमी – ७.१५ वरून ७.२५ करण्यात आले
३ वर्ष आणि ५ वर्षापेक्षा कमी – ७.२ वरून ७.३ करण्यात आले
५ वर्ष आणि १० वर्षापेक्षा कमी – ७.२५ वरून ७.३५ करण्यात आले
Summery – SBI hikes interest rates on fixed deposits for select maturities. Interest rate hiked in the range of 5 to 10 basis points.



























































