श्रीसंतचे वर्तन चुकीचेच, सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून आजीवन बंदीची शिक्षा भोगत असलेल्या श्रीसंतला सर्वोच्च न्यायालायने सुनावले आहे. 2013 सालच्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सामन्या वेळी सट्टेबाजांनी संपर्क साधला त्याच वेळी हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) याबाबत का सांगितले नाही, अशी विचारणा करत श्रीसंतचे वर्तन चुकीचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.