माजलगाव नगरपरिषदेत 1 कोटी 61 लाखाचा अपहार

माजलगाव–येथील नगरपरिषदेत 22 रस्त्यांची व नाल्यांची कामे न करता 1 कोटी 61 लाख 10 हजार रुपयांचा अपहार व फसवणूक प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी वी सी गावित ,लेखापाल अशोक कुलकर्णी-वांगीकर ,अभियंता महेश कुलकर्णी या तिघावर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखलकरण्यात आले आहेत.

येथील नगरपरिषदेस शासनाने 11 जानेवारी 2017 रोजी न.प.साठी विशेष रस्ता अनुदान अंतर्गत 1 कोटी 61 लाख 10130 रुपये इतक्या रकमेच्या 22 कामांना मान्यता देण्यात आली होती. न.प.प्रशासन संचालनालय मुंबई यांनी विविध योजना अंतर्गत झालेल्या अपहार संदर्भात 3 मे 2019 रोजी चौकशी समितीच्या अहवालानुसार प्रशासकीय मान्यता देण्यापूर्वी कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण बीड यांच्याकडून घेतलेली तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता व मोजमापे यामध्ये तफावत असल्याने फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश उपसंचालकांनी दिला. त्या नुसार नगरपरिषद अभियंता कृष्णा श्रीराम जोगदंड यांनी शहर पोलीस ठाण्यात अपहार व फसवणूकीची फिर्याद दिली. त्यानुसार तत्कालीन मुख्याधिकारी बी सी गावित,( सध्या राहता न.प.येथे मुख्याधिकारी) , लेखापाल अशोक कुलकर्णी-वांगीकर, अभियंता महेश कुलकर्णी यांच्याविरोधात शनिवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या