सेंट्रल किचनद्वारे होणार शालेय पोषण आहार पुरवठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । पुणे

येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना सेंट्रल किचन प्रणालीद्वारे शालेय पोषण सकस आहार वितरीत केला जाणार आहे. आजपर्यंत हे काम बचत गटांकडे होते, मात्र बचत गटाबद्दलच्या तक्रारी आणि आहारातील पोषक घटकांमध्ये होणारे कमी-अधिक प्रमाण लक्षात घेता केंद्र सरकारने सेंट्रल किचनचा निर्णय घेतला आहे.

प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे मोफत पोषण आहार दिला जातो. यासाठी केंद्र सरकारकडून तांदूळ आणि अन्य पोषक घटक यासाठी निधी दिला जातो. सद्यस्थितीत गेली काही वर्षे हा शालेय पोषण आहार शिजवून देण्याचे काम बचत गटामार्फत केले जात आहे. बचत गटाकडून तयार करण्यात येणाऱ्या पोषण आहारावर ठरलेल्या आहारापेक्षा कमी प्रमाणात पोषक घटक असतात, किचन अस्वच्छ असणे, बचत गटांच्या महिलांव्यतिरिक्त इतर महिला कामाला ठेकून त्यांच्याकडून पोषण आहार बनवून घेणे, ठरलेला मेनू न देणे, अस्वच्छ भांडी, यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आरोग्यदायी गरम आहाराचा पुरवठा होत नसल्याचे लक्षात आले. तसेच मुख्याध्यापकांकडूनही याबद्दलच्या तक्रारी होत्या. त्यामुळे केंद्र सरकारने सेंट्रल प्रणालीद्वारे आहार पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिका तसेच नगरपालिका शाळांमधील विद्यार्थी, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थी यांना हा पोषण आहार दिला जातो. नव्या निर्णयानुसार शहरी भागात सेंट्रल किचन तयार करून त्याद्वारे आहार पुरवठा होईल. महापालिका क्षेत्रात ज्या संस्थांची उलाढाल 55 लाखांपेक्षा अधिक आहे, शिजविलेल्या अन्नाचा पुरवठा करण्याचा अनुभव, किमान दहा हजार विद्यार्थ्यांना आहार पुरविण्याची तयारी, स्वयंपाकगृहासाठी किमान एक हजार चौरस फूट जागा असणाऱ्या संस्थांना सेंट्रल किचनसाठी परकानगी दिली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये जूनपासून या निर्णयाची अंमलबजाकणी सुरू होईल. देशात सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाशी चर्चा करून, पूर्वतयारीसाठी सेंट्रल किचनची कार्यवाही सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दररोज वेगळी पाककृती
सेंट्रल किचनसाठी केंद्र सरकारकडून केवळ तांदूळ मोफत मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दररोज वेगळी पाककृती द्यावी लागेल. प्रत्येक आठकडय़ाला एक फळ, शेंगदाणा लाडू, राजगिरा चिक्की, चुरमुरे लाडू, खजूर, खारीक देणे बंधनकारक आहे. भाजीपाला, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो याचा वापर स्वखर्चाने करायचा आहे. तसेच आहारामध्ये तूरडाळ, मसूरडाळ, मूगडाळ, चकळी, हरभरा, मटकी, वाटाणा, सोयाबीन, तेल, कांदा लसूण मसाले यांचा समावेश संबंधित संस्थेला करावा लागणार आहे.