
स्कॉटलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्रय़ूज येथील एका नवीन संशोधनाने गंभीर इशारा दिला आहे की, जगातील अनेक किनारी भाग पूर्वीच्या अंदाजे वेगापेक्षा अधिक जलद गतीने आम्लधर्मी (ऑसिडिक) होत आहेत. ही प्रक्रिया वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या वाढीमुळे होणाऱया सामान्य ऑसिडिफिकेशनपेक्षा वेगवान आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात येत आहे. विशेषतः मत्स्यपालनाला मोठा धोका आहे.
संशोधकांनी 20व्या शतकातील कोरल नमुन्यांचा बोरोन आइसोटोप वापरून अभ्यास केला. या अभ्यासात असे दिसून आले की, किनाऱयावरील पाण्याच्या पीएच पातळीत मागील सतत घट झाली आहे असून 21व्या शतकात ही घट आणखी वेगाने होण्याची चिन्हे आहेत. हा बदल जगभरातील सागरी जीवसृष्टी आणि त्यावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी गंभीर धोका आहे. मासे, कोळंबी, शिंपले आणि प्रवाळ यांसारखे समुद्री जीव वेगाने नष्ट होऊ लागतात.
– पाणी ऑसिडिक का होते?
वातावरणातील कार्बन डायऑक्साईड समुद्राच्या पाण्यात अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विरघळत आहे, ज्यामुळे पाण्याचा पीएच सतत कमी होत आहे.
– ‘अपवेलिंग’ प्रणाली
या प्रक्रियेमुळे समुद्राच्या खोल भागातील पाणी पृष्ठभागावर येते, परंतु सध्या ते अधिक आम्लधर्मी बनले आहे. हे आम्लधर्मी पाणी पृष्ठभागावर येताच हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या संपर्कात येते आणि त्यामुळे ते अनेक पटीने अधिक आम्लधर्मी बनते.


























































