देवेंद्र फडणवीस यांनी दोन बळी घेतले; आणखी किती घेणार? दुसऱ्या आंदोलकाच्या मृत्यूनंतर जरांगे यांचा संतप्त सवाल

दोन दिवसांपूर्वीच मराठा आंदोलनातील एका कार्यकर्त्याचा जुन्नर येथे मृत्यू झाला असताना आज मुंबईतील आंदोलनात सहभागी झालेल्या आणखी एका तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. यामुळे जरांगे-पाटील यांनी संताप व्यक्त केला असून ‘फडणवीसांनी दोन बळी घेतले, ते आणखी किती बळी घेणार,’ असा सवाल उपस्थित केला आहे.

आंदोलनातील आणखी एका तरुणाला जीव गमवावा लागला. विजय घोगरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील रहिवाशी आहे. या तरुणाला अस्वस्थ वाटू लागल्याने पोलिसांनी त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्याआधीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.