अभियांत्रिकी पदवी प्रवेशाची आज दुसरी यादी

अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशातील पहिल्या यादीत 1 लाख 26 हजार 458 विद्यार्थ्यांना कॉलेज अ‍ॅलोट झाले होते. त्यापैकी केवळ 28 हजार 742 विद्यार्थ्यांनी प्रवेश कर्न्फम केले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी बेटरमेंटची संधी घेतली होती. आता या विद्यार्थ्यांची सोमवारी दुसरी यादी जाहीर होणार आहे.

अभियांत्रिकी पदवी प्रवेशामध्ये 1 लाख 92 हजार 398 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 76 हजार 111 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांना पसंतीक्रम भरले होते. यापैकी 14 ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या पहिल्या फेरीत 1 लाख 26 हजार 458 इतक्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली होती. मात्र अनेकांनी बेटरमेंटची संधी घेतली आहे. आता दुसरी यादी सोमवारी जाहीर होणार आहे. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 27 ते 29 ऑगस्ट या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे.