ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर; अजिंक्य देव यांनी ट्विटरकरून दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाच दशकांहून अधिक काळ मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमरने ग्रासले आहे. त्यांचा मुलगा, अभिनेता अजिंक्य देव यांनी ट्विटरकरून ही माहिती दिली आहे. दरम्यान, आईच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन त्यांनी चाहत्यांना केले आहे. ‘माझी आई श्रीमती सीमा देव अल्झायमरच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी आम्ही संपूर्ण देव कुटुंबीय प्रार्थना करत आहोत. तिच्यावर प्रेम करणाऱया महाराष्ट्रातील चाहत्यांनीदेखील त्या लवकर बऱया होण्यासाठी प्रार्थना कराव्यात,’ असे ट्विट अजिंक्य देव यांनी केले आहे. अभिनेत्री सीमा देव आणि त्यांचे पती रमेश देव मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेले कलाकार आहेत. सीमा देव यांनी राजा परांजपे दिग्दर्शित ‘जगाच्या पाठीकर’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.