हे सॅम्पल परत पाठवा! म्हणत उद्धव ठाकरेंनी घेतला राज्यपालांच्या वक्तव्याचा खणखणीत समाचार

छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्रातून पळवलेले उद्योग, कर्नाटकने महाराष्ट्रातील गावांवर केलेला दावा अशा एकापाठोपाठ एक विषयाला हात घाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकारचा खणखणीत शब्दात समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर त्यांनी सडकून टिका केलीच त्यासोबतच यामागील मेंदू कोण हे शोधून काढलाच पाहिजे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच राज्यपालांना हटवलं गेलं नाही या महाराष्ट्र द्रोह्यांचा विरोध तमाम महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र येऊन केला पाहिजे. दोन-चार दिवस वाट पाहू मात्र असंच चालत राहिलं तर हे लोक आपल्या राज्याच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगतील. त्यामुळे त्यांना दणदणीत इंगा दाखवलाच पाहिजे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र प्रेमींना केलं आहे. ‘आपण जे सॅम्पल पाठवलं आहे ते परत घरी पाठवा, नाहीतर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसता येणार नाही’, अशी विनंती केंद्राला करत आहे अशा खणखणीत शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

मातोश्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी आक्रमक शब्दात राज्यातील सरकारवर हल्ला चढवला.

ज्यांना वृद्धाश्रमातही विचारलं जात नाही अशांना आता राज्यपाल म्हणून पाठवत आहेत का? असा प्रश्न मला पडत आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

राज्यपाल पदाचा मला आदर आहे आणि पुढेही राहिल. मात्र आताच्या महोदयांना राज्यपाल म्हणावे का असं मला वाटतं. केवळ राज्यपाल पदाची झूल पांघरली म्हणजे होत नाही, राज्यपाल आहेत म्हणून त्यांनी वेडंवाकडं काहीही बोलावं हे मी आणि आपला महाराष्ट्र मान्य करणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

काही दिवसांपूर्वी कोश्यारींनी मुंबई-ठाणे येथील मराठी माणसाचा अपमान केला होता. त्यावेळी मी म्हणाला होतो की यांना कोल्हापुरी जोडा दाखवायला हवा, असं मी म्हणालो होत. मात्र आता सातत्यानं महाराष्ट्र आणि इथल्या महापुरुषांचा अपमान होत आहे. छत्रपती शिवरायांना जुने आदर्श कसं म्हणाले? अरे बाप बाप असतो, जुना नवा असं नाही करता येत, आदर्श हे आमचं दैवत आहे, असंही ते म्हणाले.

मला तर वाटतं की ही जी शक्कल आहे ती या काळ्या टोपीतून आलेली नाही. या सडक्या मेंदू मागील मेंदू कोण आहे, हे शोधण्याची वेळ आली आहे. कारण हळूवारपणे महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अपमान करायचा आणि इथले आदर्श मनातून पुसून टाकायचे आणि त्यांची भाकडं म्हणजे त्यांचे नेते मंडळी हे आदर्श म्हणून प्रतीमा जनतेच्या मनावर बिंबवण्याची ठसवण्याची ही त्यांची जी चाल आहे तिचा निषेध आम्ही केला आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्रात शांततापूर्ण बंद केला पाहिजे जेणेकरून केंद्र सरकारला हे कळलं पाहिजे की महाराष्ट्र हा लेच्यापेच्यांचा प्रदेश नाही.

महाराष्ट्रप्रेमी आणि महाराष्ट्रद्रोह्यांचे विरोधी जो कुणी आहे, त्यांना सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन करतोय.
हीच वेळ आहे, आत्ता ही वेळ गेली तर आपला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवतील याचा अंदाज सुद्धा लागणार नाही
नाहीतर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसता येणार नाही.

केंद्राला सांगतोय हे चाळे आता बस झाले. हे सॅम्पल घरी पाठवा किंवा वृद्धाश्रम असेल तर तिथे पाठवा.
सर्व पक्षांना बाजूला सारून मी सर्वांना आमंत्रण देतोय. पक्ष राजकारणात अस्मिता आणि राज्य चिरडलं जाणार असेल तर छत्रपतींचं नाव घ्यायला नालायक आहोत.

एक खणखणीत आणि दणदणीत इंगा महाराष्ट्रद्रोह्यांना दाखवलाच पाहिजे.

मी आवाहन करतोय, विनंती करतोय की हे असंच चालत राहिलं तर आपल्या डोळ्यांदेखत शूरवीर अशी ओळख असलेल्या राज्याच्या अब्रुची लक्तरं वेशीवरती टांगताहेत आणि ती आपल्याला बघत बसावी लागतील.

आता वेळ आली आहे की या राज्यपालांना हटवलं नाही, तर या महाराष्ट्रद्रोह्यांचा विरोध तमाम महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र येऊन केला पाहिजे.

भाजपचा महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालायचा प्रयत्न, तुकडे पाडण्याचे प्रयत्न, त्याला बेकार कंगाल करायचा प्रयत्न हा त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे.

भाजप अखत्यारीतले मुख्यमंत्री वरिष्ठांच्या मर्जीशिवाय बोलू चालू शकतात का. ते नसेल तर बोम्मई जे बोलले ते त्यांच्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बोललेत का.

त्यांच्याकडून काहीही अपेक्षा नाहीत. उपमुख्यमंत्री नेहमीप्रमाणे सारवासारव करत आहेत.

महाराष्ट्रात सध्या खोके-मिंधे- ईडी सरकार आहे. मुख्यमंत्री काही बोलतच नाहीत.

महाराष्ट्राच्या अपमानानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या गावांवर दावा सांगताहेत.

पक्षाबद्दल बोलावं की त्यांच्या विचारसरणीवर बोलावं हा शोध तुम्ही आणि आम्ही घ्यायला पाहिजे त्यात भर म्हणजे भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी त्यांनाही उबळ आली.

म्हणजे महाराष्ट्रात काय सुरू आहे, याची चिंता नाही. मग काहीतरी गोलमाल उत्तरं देऊन वेळ मारून न्यायची
कॅबिनेट मीटिंग पुढे ढकलली गेली. अपवादात्मक परिस्थिती ही की गुजरातमध्ये प्रचार सुरू आहे.

या चालीचा निषेध सुरूच आहे. आता हे महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळताहेत. उद्योग गुजरातमध्ये गेले.
महाराष्ट्रात भिनलेले आदर्श पुसून टाकून आपले भाकड नेतेमंडळी आहेत, त्यांची आदर्श म्हणून प्रतिमा ठसवण्याची सतत चाललेली चाल आहे.

सावित्रीमाईंविषयीही हे असंच बोलले होते. आपण जाऊ द्या म्हणत राहिलो.

ही शक्कल राज्यपालांच्या टोपीतून आलेली नाही. त्या सडक्या मेंदूपाठील मेंदू कोण हे शोधायची वेळ आली आहे.
पण, बाप हा बाप असतो, तो जुना आणि नवा कसा काय म्हणाल. ते आमचं दैवत आहे.
त्याच्यानंतरही हे महोदय थांबले नाहीत. त्यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा एक जुन्या काळातला आदर्श असं म्हटलं आहे.

तेव्हा मी म्हणालो होतो की यांना कोल्हापुरी जोडा दाखवायची वेळ आली आहे.

काही दिवसांपूर्वी आपण भेटलो तेव्हा कोश्यारींनी मुंबई-ठाण्यातील मराठी माणसाचा अपमान केला होता
पण कुणीही राज्यपाल पदावर गेल्यानंतर काहीही वेडंवाकडं बोलावं हे महाराष्ट्र मान्य करेल असं वाटत नाही.
खरंतर राज्यपालांना मी राज्यपाल म्हणणं सोडून दिलं आहे. पदाचा मान मी करत आलो आहे, पुढेही करेन
पण, राज्यपाल जे काही बोलतात ते गांभीर्याने घ्यायची गरज आहे.

राज्यातल्या प्रश्नाची सोडवणूक राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांच्या मदतीने करायला हवी.

राज्यपाल हे राष्ट्रपतींचे दूत असतात. राष्ट्रपती हे निपक्ष असायला हवेत, ते असतात. त्याचप्रमाणे राज्यपाल हे निःपक्ष असायला हवेत.

आता राज्यपाल नियुक्तीसाठी देखील निकष ठरवायला पाहिजेत. असं माझं स्पष्ट मत आहे.

कुणी गैरसमज करू नका, पण एक शब्द वापरतो, ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का, असा प्रश्न आहे.

या माणसांची कुवत, पात्रता काय असते.

साधारणतः एक प्रघात आहे की ज्याचं सरकार केंद्रात असतं, त्यांचीच किंवा त्यांच्याच विचारसरणीची माणसं ही देशातल्या विविध राज्यांत राज्यपाल म्हणून पाठवली जातात.

माझं मत आणखी वेगळं आहे. आजपर्यंत आपल्या देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला.
मग त्यांनी असं म्हटलं आहे की, निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत सुद्धा तपासली पाहिजे आणि गरज वाटली तर बदलली पाहिजे.

या देशाला शेषनसारखा आयुक्त पाहिजे की वेळ पडली तर पंतप्रधानांवरही कारवाई करण्याची वेळ आली तर तो मागे हटता कामा नये.

न्यायमूर्तींचं मत स्पष्टपणे आलेलं आहे.

दुसरी एक केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे, त्यात निवडणुक आयुक्तांबद्दल कुणी अपील केलंय, त्याच्याबद्दल न्यायमूर्तींची मतं आपण वाचतो आहोत.

ती पद्धत अपारदर्शक आहे, असं त्यांचं मत आहे. आणि त्या नेमणुकीचे अधिकार पंतप्रधानांकडे पाहिजेत असं ते म्हणाले आहेत.

एक म्हणजे मी माझ्या शिवाजी मंदिरमधल्या भाषणात बोललो होतो की आपल्या देशाच्या कायदे मंत्र्यांनी देशातील न्यायमूर्तींच्या नेमणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
त्यातलाच हा तिसरा विषय मी आज मांडतोय.

गेल्या काही दिवसात आपण पाहतोय की, एकूण देशात एक दोन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व्हायल्या हव्यात, त्या सुरू झाल्या आहेत

या प्रतिक्रिया ज्यांनी त्यांचा अपमान केलाय त्यांच्याच पक्षातील लोकांकडून दिल्या जात आहेत.

महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आणि त्यांचा अपमान झाल्यावर गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
कुणीही यावं टपली मारावी आणि आम्ही नुसतंच शिवाजी महाराज की जय म्हणून गप्प बसावं हे आतापर्यंत खूप झालं
महाराष्ट्राला अस्मिता, स्वाभिमान, हिंमत, धमक, शक्ती काहीच नाही.
जणू काही महाराष्ट्रात माणसं राहत नाहीत.

आणि आज अचानक कर्नाटक मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या अंगात भूत संचारलं आहे.

मग ते उद्योग पळवण्याचा विषय असेल, अस्मितेचा विषय असेल, सातत्याने अवहेलना होत आहे.

महाराष्ट्रात मिंधे किंवा खोके सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची सातत्याने जी अवहेलना होत आहे

एकूणच काही दिवस, काही महिने किंवा दोन वर्षं आपण पाहत आहोत.