ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक जवाहर कौल यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

ज्येष्ठ चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते जवाहर कौल (92) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. वर्सोवा यारी रोड येथील चिल्ड्रन वेलफेअर शाळेचे प्राचार्य व शिक्षणतज्ञ अजय कौल यांचे ते वडील होते. जवाहर कौल यांच्या पश्चात 1 पुत्र, 3 कन्या, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

जवाहर कौल यांनी ‘पहली झलक’ (1955), ‘अदालत’ (1958), ‘पापी’ (1977) यांच्यासह अनेक चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. ‘कठपुतली’ या चित्रपटात अभिनेत्री वैजयंतीमाला यांच्यासोबत त्यांनी केलेली भूमिका विशेष गाजली. त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. काही काळ त्यांनी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचे सचिव म्हणूनही काम केले होते. गुरुवार, 18 एप्रिल रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत चिल्ड्रन वेल्फेअर शाळेत त्यांच्यासाठी प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले आहे.