
राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांनी आज पदभार स्वीकारला. रश्मी शुक्ला यांनी महासंचालकपदाची सूत्रे दाते यांच्याकडे सोपविली.
रश्मी शुक्ला यांना शासनाने पोलीस महासंचालकपदी दिलेला दोन वर्षांचा अधिकचा कालावधी आज संपला. त्या निवृत्त झाल्याने 1990 च्या तुकडीचे थेट आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांनी त्यांच्याकडून पोलीस महासंचालक पदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही मात्र अनौपचारिक चर्चा केली. लवकरच राज्यातील प्रत्येक जिह्याला भेट देईन. तेथील कामकाजाचा आढावा घेण्यास प्राथमिकता असेल असे ते म्हणाले.


























































