ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन, दिल्लीतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची मुलगी मल्लिका दुआ यांनी ही माहिती दिली आहे.

दुआ यांना जानेवारीमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती नाजूक बनली होती. दिल्लीतील रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज सायंकाळी त्यांचे निधन झाले. उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.