शेअर बाजार कोसळला, 1200 अंकांची मोठी घसरण

1622

देशात कोरोनाचा प्रभाव अजूनही कायम असल्याने सोमवार पासून तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात झाली. तिसऱ्या टप्प्यात रेड, ऑरेंज, ग्रीन, कंटेंमट असे झोन तयार करण्यात आले असून अटी आणि शर्तींसह दैनंदिन व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. मात्र हा बदल शेअर बाजारातील मरगळ दूर करू शकलेला नाही. त्यामुळे सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात 1293.82 अंकांची घसरण पाहायला मिळाली. तर निफ्टीही 407.05 अंकांनी घसरला आहे.

गुंतवणूकदारांना आठवड्याच्या सुरुवातीलाच तगडा झटका बसला आहे. 1293.82 अंकांनी कोसळून निर्देशांक 32,423.80 वर पोहोचला आहे. तर निफ्टीतही 407.05 अंकांची घसरण झाली असून तो 9452.85 वर पोहोचला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या