
सामना ऑनलाईन । मुंबई
डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली पडझड आणि कच्चा तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे जनतेवर पडणारा भार थोडा हलका करण्यासाठी म्हणून पेट्रोल-डिझेलच्या दरात केंद्र आणि राज्य मिळून 5 रुपयांची कपात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी जाहीर केली. अबकारी कर कमी करण्याबरोबरच तेल कंपन्यांना देखील थोडा भार उचलावा लागेल अशी घोषणा त्यांनी करताच शेअर बाजार तब्बल 800 अंकांनी कोसळला.
#Sensex down by 806.47 points, currently at 35,169.16; Nifty down by 259 points, currently at 10,599.25
— ANI (@ANI) October 4, 2018
जेटलींनी केलेल्या घोषणेनंतर शेअर बाजारात तेल कंपन्यांचे शेअर कोसळल्याचे पाहायला मिळाले आहे. निफ्टीवर ओएनजीसीचे शेअर 9.98 टक्कांनी खाली आले. तर बीपीसीएलचे शेअर 18.88 टक्क्यांनी पडले. आयओसीएलच्या शेअरमध्ये 9.98 टक्क्यांची घट पाहायला मिळाली. तर सगळ्यात मोठा फटका हिंदुस्थान पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेडला बसला. या कंपनीचे शेअर 22.44 टक्क्यांनी पडले.
यामुळे शेअर बाजार 806.47 अंकांनी खाली म्हणजे 35,169.16 अंकांवर येऊन बंद झाला.






























































