तेजीला ब्रेक; सेन्सेक्स घसरला

437

मुंबई शेअर बाजाराच्या आज सकाळच्या सत्रात तेजीत असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने तेजीला ब्रेक लागला आणि निर्देशांकात घसरण झाली. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 202 अंकांनी घसरून 41,055 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत दिवसभरात 67 अंकांची घसरण होऊन तो 12 हजार 45 अंकांवर बंद झाला.

आज बाजार सुरू होताच सेन्सेक्सने 120 अंकांची झेप घेतली होती. मात्र, ही तेजी फार काळ टिकली नाही. ‘एजीआर’ शुल्काकरून टेलिकॉम कंपन्यांची दमछाक झाली असली, तरी सर्वोच्च न्यायालयाने कंपन्यांना फटकारल्याचे पडसाद आज बाजारावर उमटले. टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्सवर परिणाम दिसून आला. आंतररराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘मूडीज’ने हिंदुस्थानच्या विकासदरात घट केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमधील खरेदीचा उत्साह कमी झाला.

आपली प्रतिक्रिया द्या