
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई शेअर बाजाराची गुरुवारची सुरुवात गुंतवणूकदारांसाठी फारशी चांगली राहिली नाही. आज बाजार सुरू होताच निर्देशांक तब्बल 604 अंकानी घसरून 35,370.89 वर पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील ही घसरण पाहून गुंतणवूकदारांमध्ये घबराट पाहायला मिळत आहे.
आज कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर येस बँक, जयप्रकाश असोसिएट, इन्फिबीम एवेन्यूज, जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर, आयसीआसीआय प्रोडेन्शिअल इन्शुरन्स, अदानी ट्रान्समिशन या कंपन्यांचे शेअर घसरल्याचे पाहायला मिळाले.
Sensex opened 604 points down, currently at 35,370.89 pic.twitter.com/oc7DDasPMT
— ANI (@ANI) October 4, 2018






























































