
जगभरातील आर्थिक क्षेत्रावर सध्या मंदीची टांगती तलवार आहे. लोकांचा गुंतवणुकीकडे ओढा कमी होत आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. आज दिवसअखेर शेअर बाजारातील निर्देशांकात तब्बल 800 अंकांची घसरण पाहायला मिळाली. तसेच रुपयाही 64 पैशांनी घसरला. याचा फटका हिंदुस्थानच्या आर्थिक विकासाला बसणार आहे.
शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसअखेर 36,563 पोहोचला. तर निफ्टीही 225 अंकांनी घसरून 10,798 अंकांवर पोहोचला. जून त्रैमासिकात जीडीपीमध्ये घसरण झाल्याने शेअर बाजारावर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. अर्थतज्ज्ञांच्या अंदाजानुसार अपेक्षेपेक्षा कमी जीडीपी राहिल्याने गुंतवणुकदारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचाच हा परिणाम आहे.

























































