तिरंग्याच्या जागी फडकवला नागालॅण्डचा स्वतंत्र झेंडा

4132

जम्मू-कश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा केंद्र सरकारने हटवला असतानाच बुधवारी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागालॅण्डमध्ये तिरंग्याच्या जागी स्वतंत्र झेंडा फडकावण्यात आला. नागा स्टुडण्टस् फेडरेशनने (एनएसएफ) नागा लोक राहत असलेल्या भागांमध्ये (म्यानमारसह) 73 वा ‘नागा स्वातंत्र्य दिवस’ साजरा केला. हा सोहळा हिंदुस्थानविरोधात नसल्याचे स्पष्टीकरण नागा जमातीचे प्रतिनिधित्व करणार्‍या संघटनांनी दिले आहे.

आम्हाला संस्कृती जपायचीय – एनएसएफ

नागा जमातीची सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक संस्कृती जपण्यासाठी तसेच न्याय्य-हक्कांचे रक्षण करण्यासाठी आम्ही हा दिवस साजरा करतो. आम्ही हिंदुस्थानविरोधात मुळीच नाही, असे स्पष्टीकरण एनएसएफच्या वतीने देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या