सेरेना करणार कम बॅक, डब्ल्यूटीए स्पर्धेत सहभागी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेरिकेची महान टेनिसपटू सेरेना विल्यम्स ही टेनिस कोर्टवर पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. ऑगस्ट महिन्यात डब्ल्यूटीएची स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. 10 ऑगस्टपासून सुरू होणाऱया या स्पर्धेत सेरेना विल्यम्ससह 2017 सालातील अमेरिकन ओपन चॅम्पियन स्लोअन स्टीफन्स हिचाही सहभाग असणार आहे.

23 वेळा ग्रॅण्ड स्लॅम जिंकणारी सेरेना विल्यम्स हिने फेब्रुवारी महिन्यात फेडरेशन कपमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर कोरोनामुळे इतर खेळांप्रमाणे टेनिसच्या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या. काही स्पर्धा रद्दही करण्यात आल्या. आता ऑगस्ट महिन्यापासून एटीपी व डब्ल्यूटीए स्पर्धांना सुरुवात करण्यात येणार आहे. 31 ऑगस्टपासून अमेरिकन टेनिस ग्रॅण्ड स्लॅमही खेळवण्यात येईल. या स्पर्धेतही सेरेना विल्यम्स सहभागी होईल. अनुभवी खेळाडू सेरेना विल्यम्स हिने स्वतःच याबाबत कळवले आहे.