दहा खून करून तो पापं धुण्यासाठी कुंभमेळ्यात आला आणि…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

सामना ऑनलाईन । प्रयागराज

‘करून करून भागला आणि देवपूजेला लागला’ ही म्हण कुंभमेळ्यातून पोलिसांनी अटक केलेल्या एका व्यक्तिला तंतोतंत लागू होते. सिरीयल किलर असलेल्या या व्यक्तीने दहा जणांचे खून केले होते. त्यानंतर तो पापं धुण्यासाठी कुंभमेळ्याच्या त्रिवेणी संगमावर डुबकी घ्यायला आला होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली.

कलुआ उर्फ साई बाबा उर्फ सुभाष असे त्या सिरीयल किलरचे नाव असून तो प्रयागराज जिल्ह्यातील बसेहारा गावचा रहिवासी आहे. कलुआ हा माथेफिरू असून त्याने रस्त्यावर झोपलेल्या अनेकांवर चाकूने हल्ले केले आहेत. त्यातील दहा जणांचा मृत्यू झालाय. कलुआचे हे प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. पोलिसांनी कलुआवर 50 हजार रुपयांचे बक्षिस देखील ठेवले होते. नुकतीच कलुआने कुंभमेळ्या जवळच एका व्यक्तिची हत्या केली होती.