नागपूरमध्ये ब्लँकेट नाही दिले म्हणून नोकराने केला ढाबा मालकाचा खून

748

नागपूरमध्ये एक क्षुल्लक कारणावरून नोकराने ढाबा मालकाचा खून केला आहे. रात्री झोपताना ब्लँकेट नाही दिले म्हणून नोकराने मालकाचा खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नागपूर जबलपूर महामार्गावर वडंबा गावात एक ढाबा आहे. बालगोवंद जयसवाल यांच्या तो मालकीचा असून तिथे नारायण सिंह बवाड हा काम करत होता. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास नारायणला खूप थंडी वाजत होती. त्यामुळे त्याने मालकाकडे ब्लँकेट मागितले. मालक बालगोविंदने ब्लँकेट दिले नाही. म्हणून नारायणने मालकाच्या डोक्यात रॉडने प्रहार केला. त्यात मालकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी नोकर नारायणला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या