मंत्रालयातील इंटरनेट सेवा ठप्प; सर्व्हर डाऊन झाल्याने कामे रखडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंत्रालयाचा सर्व्हर अचानक डाऊन झाल्याने त्याचा परिणाम आज विविध विभागांची कार्यालये आणि इंटरनेट सेवेवर झाला. तब्बल तीन तास कर्मचाऱयांना मंदगतीने चालणाऱया इंटरनेट तसेच सर्व्हरमुळे अनेक कामे रखडली. अखेर 4.30 वाजण्याच्या सुमारास ही सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली.

मंत्रालयातील इंटरनेट सेवा दुपारी 1.30 वाजल्यापासून बंद झाली होती. संपूर्ण कामे यामुळे ठप्प झाली. यानंतर तांत्रिक विभागाकडून ही सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली. दुपारी 4.30 नंतर ही सेवा पूर्ववत करण्यात यश मिळाले.