शिमल्याला जाल तर स्मशानातील पाणी प्यावे लागेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, चलाऊंथी

शिमल्यामध्ये भयंकर पाणीटंचाई निर्माण झाली असून इथे चलाऊंथी भागातील लोकांना स्मशानभूमीतील पाणी प्यावं लागतंय. इथल्या अनेक भागांमध्ये गेल्या सात दिवसांपासून नळाला पाणीच आलं नाहीये, यामुळे इथल्या ग्रामस्थांनी कनलोग इथे तसेच चंदीगड-सिमला महामार्गावर आंदोलन देखील केलं होतं. आंदोलन करूनही पाणी न मिळाल्याने इथल्या लोकांना स्मशानभूमीतून पाणी भरण्यावाचून पर्याय उरला नव्हता.

आम्हाला पाणी मिळत नाहीये, पाण्यावाचून तडफडून मरण्याची पाळी आल्याने आम्हाला स्मशानभूमीतून पाणी घेण्यावाचून पर्याय उरला नव्हता असं सतीश कुमार या संजीवनी जनकल्याण सोसायटीच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे. कुमार यांनी सांगितलं की आंदोलनामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात झाली खरी मात्र जवळपास ५ हजार लोकवस्ती असलेल्या त्यांच्या भागासाठी हे पाणी अपुरं आहे. या वर्षी बर्फवृष्टी कमी झाली आहे, त्यामुळे बर्फ वितळून तयार होणारं पाणी काही दिवसातच संपून गेलं, यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचं सांगण्यात येत आहे.