सेक्सटॉर्शनमधील आरोपीला राजस्थानमधून अटक; सप्टेंबरमधील घटनेचा उलगडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलेचा व्हॉटसअॅप डिपीचा वापर करून मोबाईलद्वारे एकाला संपर्क करीत न्यूड व्हिडीओ बनवुन व्हायरल करण्याच्या धमकीमुळे एका तरुणाने आत्महत्या केली होती. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तब्बल आठ दिवस शोध घेत राजस्थानमधील आरोपीला अटक केली आहे. ही घटना 30 सप्टेंबरमध्ये घडली होती.

तरुणाचा न्यूड व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम, मॅसेंजर, टयुटर, यु टयुब चॅनेल, फेसबुक या सोशल मिडीया साईटवर अपलोड करण्याची धमकी देत आरोपीने साडे चार हजार रुपये उकळले होते. त्यानंतरही सायबर टोळीने वारंवार तरुणाला फोन करून न्यूड व्हिडीओ अपलोड करण्याची भिती दाखवत त्याला मानसिक त्रास दिला. त्यामुळे त्याने “ मै सुसाईड कर रहा हूं” असा मॅसेज आरोपीला केला. त्यावर “ करो मै व्हिडीओ ऑनलाईन करता हूं” असे म्हणत सतत पैशाची मागणी केली. अशा प्रकारे आरोपीने तरुणाला आत्महत्या करण्यास भाग पाडले.

सहकारनगर पोलिसांनी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या मोबाईलचे तांत्रीक विश्लेषण करुन माहिती काढली. आरोपी राजस्थानमध्ये असल्याचे उघडकीस येताच पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, सागर सुतकर, निखील राजीवडे, सागर कुंभार यांनी (रायपूर सुकेती, ता. सिकरी जि. भरतपूर), राजस्थान गाठले. तेथे जात संशयीत आरोपीचा ठावठिकाणाबाबत माहिती घेत स्थानिक पोलिसांच्या मदतीने सलग 8 दिवस व रात्रीची रेकी केली. अखेर आरोपीला ताब्यात घेत पोलीस कस्टडी रिमांड घेतली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, सागर सुतकर, निखील राजीवडे, सागर कुंभार यांनी केली आहे. गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर करीत आहेत.