तंबाखू खाताना शाहिद आफ्रिदी कॅमेर्‍यात कैद, व्हिडिओ व्हायरल

सामना ऑनलाईन । मुंबई

पकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आपल्या कामगिरी आणि वादामुळे नेहमी चर्चेत असतो. सध्या तंबाखू खाल्याप्रकरणी आफ्रिदी पुन्हा चर्चेत आला आहे. शाहिद आफ्रिदीचा तंबाखू खातानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

६ सप्टेंबर रोजी पाकिस्तानमध्ये संरक्षण दिन साजरा केला गेला. त्यात आफ्रिदीने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आफ्रिदीने तंबाखू काढून आपल्या तोंडात टाकली. ही घटना कॅमेर्‍यात कैद झाली आणि हा हा म्हणता सोशल मिडियावर व्हायरल झाली. हा व्हिडिओ नेटकर्‍यांनी शेअर करून आफ्रिदीवर टीका केली आहे. काहींनी एक फ़ॅन गमावल्याची प्रतिक्रिया दिली आहे तर काही जणांनी याची खिल्ली उडवली आहे.