शाहीदची तब्येत बिघडली, शूटींग पुढे ढकललं

कबीर सिंग चित्रपटात दमदार अभिनय केल्यानंतर ‘जर्सी’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असणारा बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूर याची तब्येत बिघडली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला अस्वस्थ वाटतंय. अशक्तपणाही आलाय. यामुळे जर्सी चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे.

पिंकविलाने याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार कबीर सिंगमधला शाहीदचा अभिनय त्याच्या चाहत्यांना खूपच भावला. त्यामुळे चित्रपट हीट ठरला. याचपार्श्वभूमीवर आता दक्षिणात्य चित्रपट ‘जर्सी’चा हिंदी रिमेक येतोय. यातही शाहीद प्रमुख भूमिकेत चमकणार आहे. त्याच्याच शूटींगमध्ये व्यस्त असताना अचानक त्याची तब्येत बिघडली. याच कारणामुळे शाहीदला एका अवॉर्ड सेरेमनीला जाते आले नाही.

दरम्यान, डॉक्टरांनी शाहीदला एका आठवड्याच्या सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पण कामाप्रती प्रामाणिक असलेल्या शाहीदने सुरुवातीला डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले व तो शूटींगला गेला. पण तिते गेल्यावर त्याला अशक्तपणा वाटू लागला. त्यामुळे निर्माते अमन गील यांनी तातडीने शूटींग थांबवले. शाहीदची तब्येत जास्त महत्वाची आहे. असे त्यांनी सांगितले आहे. जर्सी हा दक्षिणेचा चित्रपट असून त्याचा हिंदीत रिमेक बनवण्यात येत आहे. गौथम तिन्नामुरी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून शाहीदबरोबर मृणाल ठाकूर ही मराठमोळी अभिनेत्री यात दिसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या