
महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्या निमित्ताने नरिमन पॉईंट येथे सोमवार, 20 मार्चला संध्याकाळी 6 वाजता यशवंतराव चव्हाण केंद्रात ’रंग शाहिराचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक विभागाच्यावतीने साजरा करण्यात येणार्या या कार्यक्रमाचे लेखन लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक डॉ. प्रकाश खांडगे यांनी तर दिग्दर्शन संतोप पवार यांनी केले आहे. गण, गवळण, वासुदेव गीत, कोकवाल्याचे गीत, नृत्याची लावणी, बैठकीची लावणी, गोंधळी गीते, वाघ्या मुरळीची गीते आणि त्यावर आधारित नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नंदेश उमप, गणेश चंदनशिवे, चारुशीला वाच्छानी, विवेक ताम्हणकर, नागेश मोरवेकर, हेमाली शेडगे, खुखदा खांडगे-खैरे, योगेश चिकटगावकर विकास कोकाटे, सुभाष खरोटे, शाहीर लिंगायत आदी कलाकार सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.





























































