‘मर्सिडीज’ आणि ‘BMW’ पेक्षाही महाग आहे शाहरूखचे घड्याळ, वाचा काय आहे वैशिष्ट्य

2360

अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस (Amazon CEO Jeff Bezos) हे गेल्या आठवड्यांमध्ये तीन दिवसांच्या हिंदुस्थान दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी हिंदुस्थानात 1 बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. बेझोस यांची बॉलिवूड स्टार शाहरूख खान याच्यासोबतची एक मुलाखतही प्रसिद्ध झाली. या मुलाखतीमध्ये शाहरूखने घातलेल्या घड्याळाची सर्वत्र चर्चा आहे. कारण या घड्याळाची किंमत ‘मर्सिडीज’ आणि ‘BMW’ या लक्झरी गाड्यांपेक्षा जास्त आहे.

शाहरूख खान याने Patek Philippe या कंपनीचे Aquanaut Chronograph Watch हे घड्याळ घातले होते. आता तुम्ही म्हणाला यात काय विशेष. तर यात विशेष हेच आहे की याची किंमत थोडीथोडीकी नाही तर तब्बल 45 हजार डॉलर अर्थात हिंदुस्थानी रुपयांमध्ये 30 लाख रुपयांपेक्षाही जास्त आहे.

Patek Philippe कंपनीचे हे खास घड्यास असून हे सहजासहजी उपलब्ध होत नाही. विशेष ऑर्डर असेल तरच हे घड्याळ कंपनी बनवते. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइस्टाईन यांनीही 1915 मध्ये Patek Phillipe या कंपनीचे घड्याळ खरेदी केली होते.

patek-philippe

काय आहे खास?
लक्झरी घड्याळांमध्ये Patek Phillipe कंपनीची घड्याळं नेहमीच उजवी राहिली आहेत. जगात सर्वात महाग घड्याळ विकण्याचा विक्रमही याच कंपनीच्या नावावर आहे. Patek Phillipe ही कंपनी 1839 पासून घड्याळ बनवण्याचे काम करते. पारंपारिक पद्धतीनेच घड्याळ बनवण्यात या कंपनीचा हातखंडा आहे. या घड्याळाचे डिझाईन आणि प्रत्येक पार्ट हाताने तयार करण्यात येतो. एका घड्याळामध्ये साधारणत: 252 पार्ट असतात. राजघराण्यातील लोकांकडे या कंपनीची घड्याळं पाहायवयास मिळतात. कंपनी प्रत्येक वर्षी 50 हजार घड्याळांची निर्मिती करते. घड्याळ नवीन विकत घेताना नाही, तर सेकंड हॅन्ड विकताना या कंपनीच्या घड्याळाला अधिक रक्कम मिळते असा इतिहास आहे.

आपली प्रतिक्रिया द्या