
अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन दुखापतीमुळे वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. अशी माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सोमवारी दिली. शाकीब अल हसनला पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात दुखापत झाली. त्यामुळे त्याला दुसऱ्या डावात गोलंदाजीही करता आली नाही. याचा फटका बांगलादेशला बसला. वेस्ट इंडीजने संस्मरणीय विजय संपादन करीत मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली.





























































