एक वर्षाच्या बंदीनंतर अष्टपैलू शाकिबची बांगलादेश संघात ‘घरवापसी’

2019 च्या अखेरीस बेशिस्त वर्तनाबद्दल संघातून हकालपट्टी केलेला नामवंत अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसनने पुन्हा बांगलादेश संघात पुनरागमन करणार आहे. शाकिबवर खरे तर दोन वर्षांची बंदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (आयसीसी)ने घातली होती. पण चांगल्या वागणुकीचे लेखी वाचन दिल्यानंतर आयसीसीने त्याच्यावरील बंदी एक वर्षाने कमी करीत त्याला पुन्हा राष्ट्रीय संघात खेळण्याची परवानगी दिली आहे.

शाकिबवरील बंदी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये संपली आहे. त्यामुळे आयसीसीने त्याला आता बांगलादेश संघातून खेळण्याची परवानगी दिली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शाकिबची वेस्ट इंडिज दौऱयासाठी निवड केल्यावर त्याच्या पुनरागमनावर शिक्कामोर्तब झाले आहे. शाकिबला विंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठीच्या बांगलादेश संघात स्थान दिले आहे. मात्र या संघाचे नेतृत्व तमाम इक्बालच करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या