
सामना ऑनलाईन । मुंबई
आssऊ, ललिता म्हणणारे बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध व्हीलन शक्ती कपूर यांनीही आता या वादात उडी घेतली आहे. दररोज होणाऱया आरोपांचा स्पीड पाहिला तर उद्या कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही आरोप करेल, असे शक्ती कपूर यांनी म्हटले आहे.
लैंगिक शोषणातील 70 टक्के प्रकरणे ही ब्लॅकमेलिंगची असतात. कोर्टाने दोषी ठरवल्यावरच एखाद्या व्यक्तीचे नाव उघड केले पाहिजे. आरोप झाल्यामुळे त्या व्यक्तीची कारकीर्द संपून जाते. त्याला नोकरीवरून काढून टाकले जाते. कुटुंब, त्याची पत्नी, मुले त्याच्याकडे संशयाने पाहतात. साजीद खानची हकालपट्टी झाली. हृतिक रोशन, अमिताभ बच्चन यांच्यावरही आरोप झाले. उद्या कोणी उठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही आरोप करेल. आता ‘मी टू’बाबत कायदा बनवण्याची वेळ आली आहे, असे शक्ती कपूर म्हणाले.



























































