हडपीड स्वामी समर्थ मठात साडेतीन शक्तिपीठ दर्शन सोहळा

देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील सत्वयुक्त देवीची दोन दिवस स्थापना तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या नूतन चरण पादुकांची प्रतिष्ठापना प. पू. जगद्गुरू शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर यांच्या हस्ते होणार आहे. 23 मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन तसेच स्वामी समर्थ मठाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त स्वामी मठाचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त 22 ते 24 मार्च या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा शक्तिपीठ दर्शन सोहळा संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई-जोगेश्वरी मंडळ, हडपीड स्वामी मठ गाव समिती आणि कोकण कट्टा विलेपार्ले यांच्या सहकार्याने होणार आहे.