
अभिनेत्री विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर नंबर वन ठरला आहे. ह्युमन कॉम्प्युटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवी यांच्या जीवनावर हा सिनेमा आहे. गेले काही आठवडे नंबर वन असलेल्या ‘दिल बेचारा’ची जागा ‘शकुंतला देवी’ सिनेमाने घेतली आहे. ओटीटीवर सर्वाधिक लोकांनी बघितलेला हा सिनेमा ठरला आहे.
‘शकुंतला देवी’ सिनेमा 31 जुलै रोजी प्रदर्शित झाला असून तेव्हापासूनचा हा ट्रेंडमध्ये आहे. 7 ते 13 ऑगस्ट दरम्यानच्या ट्रेंडनुसार पहिल्या नंबरला ‘शकुंतला देवी’ सिनेमा आहे. ओरमॅक्स मीडियाने ट्विटवरवर याबाबतची माहिती शेअर केली आहे. विद्या बालन व्यतिरिक्त ‘शकुंतला देवी’ सिनेमांत जिस्सू सेनगुप्ता, सान्या मल्होत्रा आणि अमित साध यांच्या भूमिका आहेत. सिनेमाचे संगीतही प्रेक्षकांना आवडतंय. ‘शकुंतला देवी’ सिनेमाला प्रेक्षकांना भरभरून प्रेम आणि कौतुक मिळाल्याने काही काळासाठी हा सिनेमा ट्रेंडमध्ये आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.





























































