
गोरेगावमध्ये असलेल्या हनुमान प्रासादिक भजनी मंडळातील ह.भ.प. माधव चौबळ यांच्या आई शालिनी रघुनंदन चौबळ यांचे नुकतेच अल्पशा आजाराने त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. गेले सात-आठ महिने त्या किडनीच्या विकाराने त्रस्त होत्या. त्या मनमिळावू आणि सर्वांना मदत करणाऱ्या होत्या. त्यामुळे परिसरात त्या चांगल्या परिचयाच्या होत्या. शालिनी यांच्या पश्चात चार मुले, तीन सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.






















































