भाजपसोबतच्या युतीत कालसारखे कटू अनुभव आम्हालाही येत आहेत, शिंदेगटाच्या मंत्र्यांची सभागृहात कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीदरम्यान झालेल्या राड्याचे तीव्र पडसाद आज विधान परिषदेत पाहायला मिळाले. या प्रकरणावरून विधानपरिषदेत भाजप आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांचे सूर उमटले.सातारा जिल्हा परिषदेतील गोंधळावर भाष्य करताना मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपसोबतच्या युतीत आम्हालाही कटू अनुभव येत असल्याची कबुली सभागृहात दिली.

विधान परिषदेत बोलताना शंभुराज देसाई यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या स्थानिक कार्यपद्धतीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मंत्र्यांना संरक्षण मागावे लागते ही आजची वस्तुस्थिती आहे. आम्ही भाजपसोबतची युती टिकवण्यासाठी राजकीय भूमिका घेतली होती. मात्र, आज याच युतीमध्ये आम्हाला कालसारखे काही अत्यंत कटू अनुभव येत आहेत. त्याची योग्य व्यासपीठावर आम्ही दखल घेऊ, असे सांगत त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली.

एसपी तुषार दोशींच्या निलंबनाची मागणी

दरम्यान, साताऱ्यात भाजपने पोलीस आणि प्रशासनाचा पुरेपूर वापर करत सत्ता बळकावली आहे. 100 पेक्षा जास्त पोलिसांनी आमच्यावर हल्ला केला आहे. त्यामुळे आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी शंभुराजे देसाई यांनी यावेळी केली.

मंत्री मार खाताहेत, आता सत्ता सोडण्याची हिंमत आहे का? अनिल परब सभागृहात आक्रमक