Video – शंकर महादेवन चिमुरडय़ा संगीत शिक्षकाच्या प्रेमात, एके दिवशी त्याला भेटण्याची संधी मिळो!

प्रसिद्ध गायक- संगीतकार शंकर महादेवन एका चिमुकल्याच्या प्रेमात पडले आहेत. चिमुकल्याचा व्हिडीओ बघून ते इतके भारावलेत की एक दिवस त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शंकर महादेवन यांनी इन्स्टाग्रामवर एका मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. मुलगा व्हिडीआत एका मुलीला गाणे शिकवतोय. मुलाचा आवाज, त्याची शिकण्याची पद्धत आणि सुरांबद्दलची समज बघून महादेवन अवाक झाले आहेत.

महादेवन यांनी लिहिलंय, मी आतापर्यंत पाहिलेला सर्वात गोड आणि सर्वात भारी संगीत शिक्षक. त्याचा आवाज अगदी नैसर्गिक आहे. जणूकाही जन्मजात गिफ्ट. गाणं शिकवताना त्याच्या चेहऱयावरचा आनंद आणि उत्साह बघा. त्याचा उत्साह बघून समोरची चिमुरडीही गाणं शिकण्याचा आनंद घेत आहे. एकदा त्याला भेटण्याची संधी मिळो, अशी मी आशा करतो.

शंकर महादेवन यांनी शेअर केलेल्या व्हिडीओतील मुलगा कोण, पुठला याची माहिती मिळालेली नाही. मात्र तो सामान्य पुटुंबातील आहे, असे व्हिडीओवरून तरी वाटतं. व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून अवघ्या तीन तासांत 90 हजार ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी व्हिडीआवर कमेंट करताना ‘भविष्यातील शंकर महादेवन’ असे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या