
राज्यसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी मला सहकार्य केले. महाराष्ट्रात होणाऱया विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना जो उमेदवार देईल त्याला राष्ट्रवादी कॉँग्रेसचा पूर्ण पाठिंबा राहील, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले.
मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना शरद पवार यांनी विधान परिषद निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली. माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी मोलाची मदत केली. आता विधान परिषदेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे नाव देतील त्याला आमचे पूर्ण सहकार्य राहील. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्रितपणे निर्णय घेतील, असे शरद पवार म्हणाले.
























































