
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज ब्रीच पॅण्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना आठवडाभर विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने तपासणी केली असून 15 दिवसांनंतर जर त्यांचे शरीर चांगली साथ देत असेल तर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले. शरद पवार यांना 30 मार्च रोजी पोटदुखीचा त्रास होत असल्याने ब्रीच कॅण रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.





























































