रामायण असो की महाभारत, त्याची देशाला गरज नाही – पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
शरद पवार – 1) 18 जुलै, 1978 ते 17 फेब्रुवारी, 1980 (पुलोद), 2) 26 जून, 1988 ते 25 जून 1991 (काँग्रेस), 3) 6 मार्च, 1993 ते 14 मार्च, 1995 (काँग्रेस)

सामना प्रतिनिधी । मुंबई

अयोध्येत न्याय झाला नाही तर ‘महाभारत’ होईल, असे वक्तव्य करून जर कुणी काही संकेत देत असेल तर सरकारने हे गांभीर्याने घेतले पाहिजे. ज्यांच्या हातात सरकार आहे त्यांची जबाबदारी देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची आहे. रामायण असो वा महाभारत, त्याची देशाला गरज नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर भाष्य केले.

अयोध्येत लवकरात लवकर राम मंदिर उभारले पाहिजे. अयोध्येत न्याय झाला नाही तर महाभारत होईल आणि मुस्लिमांशिवाय हिंदुत्व पूर्ण होत नाही, अशी वक्तव्ये काल मोहन भागवत यांनी केली होती. त्यावर पवार म्हणाले, मुस्लिम, ख्रिश्चन देशाचे घटक आहेत. या देशावर जेवढा माझा अधिकार आहे तेवढा त्यांचा आहे. जेवढा मी हिस्सेदार आहे तेवढाच ते आहेत. ते कुणी सांगण्याची गरज नाही. मुस्लिम हे जन्मतŠ नागरिक आहेत. छत्तीसगढमध्ये मायावतींनी अजित जोगी यांच्यासोबत युती करून महाआघाडीला धक्का दिलाय याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, हा धक्का वगैरे नाही. छत्तीसगडमध्ये या पद्धतीची बोलणी सुरू होती. काँग्रेसही इतरांसोबत जाण्याच्या तयारीत होता असे मला वाटत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे युती करण्यावाचून पर्याय नव्हता.

…मग आंबेडकरांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा का घेतला?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे धर्मनिरपेक्ष आहेत, परंतु त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही असे वक्तव्य भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष पक्ष नव्हता तर अकोल्यातील निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी दोनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा का घेतला, असा सवाल पवार यांनी केला.