
लोणावळा येथे आयोजित केलेल्या बैठकीला नेत्यांनी जाऊ नये म्हणून अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली. यावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पुन्हा अशी दमदाटी केली तर मला शरद पवार म्हणतात अशा शब्दात सुनील शेळके यांना खडसावले.
लोणावळय़ातील सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली हीच मोदींची गॅरेंटी आहे, अशी टीकाही पवारांनी केली. मला काहींनी सांगितले की आजच्या मिटींगला येऊ नये म्हणून काहींनी आम्हाला दमदाटी केली. टीका केली म्हणूनही पह्न करुन दमदाटी केली. लोकशाहीमध्ये जाहीर बोलायचं नाही का? इथल्या आमदारांना मला सांगायचे आहे, तुम्ही आमदार पुणामुळे झाला, तुमच्या सभेला कोण आलं होतं, त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष कोण होते, त्यावेळी पक्षाच्या फॉर्मवर सही माझी होती. तुमच्या आमदाराकीवेळी याच कार्यकर्त्यांनी काम केलं , तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले, घाम गाळला आज त्याच कार्यकर्त्यांना तुम्ही दमदाटी करता. माझी त्यांना विनंती आहे, एकदा त्यांनी दमदाटी केली… बास्स! पुन्हा असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात! मी या रस्त्याने कधी जात नाही. पण या रस्त्याने जाण्याची स्थिती पुणी निर्माण केली तर सोडत नाही, असा इशारा शरद पवार यांनी आमदार सुनिल शेळके यांना दिला.


























































