मोदी सरकारने काढली शरद पवारांची दिल्लीतील सुरक्षा

1210
sharad-pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान तैनात होते. मात्र 20 जानेवारीपासून ही सुरक्षा कोणतीही पूर्वसूचना न देता हटवण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सुरक्षा पुरवली जाते. संबंधित व्यक्तीला असलेल्या धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेतला जातो. वेळोवेळी सुरक्षेचा आढावा घेतला जातो. सुरक्षेत कपात करायची असल्यास संबंधित व्यक्तीला त्याची पूर्वकल्पना दिली जाते. मात्र शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी असणारी सुरक्षा काढून घेताना असे काहीही झालेले नाही किंवा सुरक्षा काढण्याचे कारण सरकारने दिलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

याआधी सोनिया गांधींची एसपीजी सुरक्षा हटवली होती
केंद्र सरकारकडून याआधी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा हटवण्यात आल्यानंतर वाद निर्माण झाला होता. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याही एसपीजी सुरक्षेत बदल करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या