पाच राज्यांच्या निवडणुकांत मोदीविरोधी संतापाचा स्फोट होईल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
शरद पवार – 1) 18 जुलै, 1978 ते 17 फेब्रुवारी, 1980 (पुलोद), 2) 26 जून, 1988 ते 25 जून 1991 (काँग्रेस), 3) 6 मार्च, 1993 ते 14 मार्च, 1995 (काँग्रेस)

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

पाच राज्यांमध्ये आता होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी सरकारविरोधातील संतापाचा स्फोट मतपेटीतून होईल, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

कश्मीरमध्ये सत्तास्थापनेसाठी पक्षांना संधी देणे ही राज्यपालांची जबाबदारी होती, पण विधानसभाच बरखास्त करण्याचा राज्यपालांचा निर्णय निषेधार्ह आहे. मोदी सरकारने स्वार्थी व वैयक्तिक पक्षाचा विचार केला आहे.

शरद पवार म्हणाले, विरोधकांना मतपेटीतून रोखता येणे शक्य नसल्यानेच सीबीआयचाही वापर होत आहे. देशाची सत्ता एकाच कुटुंबाच्या हातात असल्याचा एकच अजेंडा राबविणाऱयांना काँग्रेसकडून यापूर्वीही उत्तर दिले आहे. पण गेल्या साडेचार वर्षांत या सरकारने काय केले हे ठामपणे सांगता येत नाही. अनेक धोरणे जाहीर केली, पण ती पूर्ण केली नाहीत. त्याचे परिणाम आता दुष्काळात जाणवू लागले आहेत.

आता 1 डिसेंबर लांब नाही!
मराठा आरक्षणासंदर्भात समाजातील गरीब माणसांत, जातीजातींमध्ये दुही माजविण्याचे काम आज भाजप आणि मुख्यमंत्री करीत आहेत. यातून मराठा विरुद्ध ओबीसी पावले टाकून या दुहीचा फायदा निवडणुकीत मिळेल हे मुख्यमंत्र्यांचे दिवास्वप्न आहे. त्यामुळे अधिवेशनात मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात हे सरकार फसवणूक करेल अशी शंका व्यक्त करीत आता 1 डिसेंबर लांब नसल्याचा टोलाही शरद पवार यांनी लगावला.