गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर पवारांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, खास शैलीत घेतला समाचार

2879

भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर पहिल्यांदाच शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून खास शैलीत चिमटे घेतले आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याची नोंद घ्यावी असे त्यांचे काही काम नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी पडळकर यांच्यावर निशाणा साधला.

‘सांगली लोकसभा निवडणुकीत पराभव व बारामती विधानसभा निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे लोकांनी स्वतःहून त्यांना बाजूला केले असल्याचे दिसून येते’, असेही शरद पवार म्हणाले.

काय म्हणाले होते पडळकर?
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. पवार छोट्या-छोट्या गटांना लढवून फायदा घेत आले, असे विधान गोपीचंद पडळकर यांनी केले. गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून जोरदार पलटवार केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यात ठिकठिकाणी निषेध सुरू झाला आहे. मंत्री धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

शरद पवार यांच्या विरोधातील वक्तव्य भोवले, गोपीचंद पडळकरांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल

आपली प्रतिक्रिया द्या