शरद पोंक्षे यांचा दरारा; ‘आक्रंदन’मध्ये खलनायक

470

अभिनेते शरद पोंक्षे आगामीआक्रंदनया चित्रपटात खलनायकाच्या रूपात दिसणार असून त्यांचा वेगळाच दरारा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘आक्रंदनयेत्या 29 नोव्हेंबरला प्रदर्शित होईल. शशिकांत देशपांडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे

भूमिकेबद्दल शरद पोंक्षे सांगतात, ‘राजाभाऊही व्यक्तिरेखा मी साकारली असून तो सरपंचाचा लहान मग्रूर भाऊ आहे. गावात त्याची दहशत असते. ‘आक्रंदनया चित्रपटाच्या माध्यमातून  अतिशय संवेदनशील विषय हाताळला आहे. जातीपातीचे राजकारण आजही आपल्याकडे सुरू आहे. आपल्याला त्याची दाहकता दिसून येत नाही. ही दाहकता दाखवतानाच बदलाची नांदी चित्रपटातून मिळते. चित्रपटात उपेंद्र लिमयेविक्रम गोखले, मिलिंद इनामदार, गणेश यादव, बाळ धुरी, तेजश्री प्रधान, अमिता खोपकर, प्रदीप केलणकर, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे यांच्या भूमिका आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या